India Morning News
दोन दुचाकी वाहन व मोबाइल सह लाखांचा मुद्देमाल जप्त
कन्हान : – कन्हान पोलीसांच्या डीबी पथकाने दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकास अटक करुन त्याचा जवळुन दोन दुचाकी वाहन व मोबाइल सह १,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात डीबी पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली कि , विधीसंघर्षग्रस्त बालकाने दुचाकी वाहन क्रमांक एम.एच.४० सि.आर.९०७८ चोरली आहे . सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण , नापोशि अमोल नागरे पो.शि जीवन विघे , मोहीत झाडे सह आदि पोलीस कर्मचारी कांद्री येथील विधीसंघर्षग्रस्त बालकाचा घरी गेले . घरासमोर विधीसंघर्षग्रस्त बालक मिळुन आल्याने पोलीसांनी विचारपुस केली असता त्याने घराच्या मागे नेऊन उभी असलेली दुचाकी वाहन दाखविली . विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे मोबाईल मिळुन आल्याने पोलीसांनी दुचाकी वाहन व मोबाईल बाबत विचारणा केली असता सांगितले कि , होन्डा शाईन दुचाकी वाहन क्र.एम ४० सी आर ९०७८ ही जे.एन.गेट कांद्री येथून चोरली . पल्सर २२० एफ मोटार सायकल काळा लाल पट्टा असलेला मनसर येथून चोरली . one plus कंपनीचा स्मार्ट फोन नागपुर येथून चोरुन आणल्याचे सांगीतले . पोलीसांनी विधीसंघर्ष ग्रस्त बालकास अटक करुन त्याचा जवळुन दोन दुचाकी वाहन किंमत १,६५,००० रुपये आणि एक मोबाइल किंमत १५,००० असा एकुण १,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , हरिष सोनभद्रे , अमोल नागरे , अश्विन गजभिए , जीवन विघे , मोहित झाडे सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .










Comments are closed