Shopping cart

  • Home
  • Politics
  • मी गद्दारांना उत्तर देत नाही;रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

मी गद्दारांना उत्तर देत नाही;रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

October 4, 20250 Mins Read
उद्धव ठाकरे प्रतिक्रिया
106

India Morning News

Share News:
Share

मी गद्दारांना उत्तर देत नाही; रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या गंभीर आरोपानंतर, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

दसऱ्याच्या दिवशी मुंबईत पार पडलेल्या दोन वेगवेगळ्या मेळाव्यांनंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या खळबळीला ठाकरे यांच्या वक्तव्याने नवा उधाण आला आहे.

रामदास कदम यांनी शिंदे गटाच्या मेळाव्यात बोलताना म्हटलं होतं की,

“बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. त्या काळात काय चाललं होतं हे जाणून घेणं गरजेचं आहे.”

या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,

उद्धव ठाकरे प्रतिक्रिया “मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही, आणि देण्याची मला गरजही नाही. ठाकरे म्हणजे काय आहेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे.”

त्यांना विचारलं असता की अशा आरोपांमुळे वैयक्तिकरीत्या त्रास होतो का, यावर ठाकरे म्हणाले,

“हो, मला वेउद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर दिली प्रतिक्रियार्कवरील भाषणादरम्यान हजारो लोकांचं समर्थन मिळतं — तेच माझ्यासाठी वेदनांवरचं औषध ठरतं. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठीशी आहेत.”

या संपूर्ण प्रकरणामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील वैमनस्य आणखी तीव्र झालं असून, दसऱ्यानंतर दोन्ही गटांतील राजकीय युद्ध अजूनच तापण्याची चिन्हं दिसत आहेत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share