India Morning News
सुप्रसिद्ध कलाकार माधुरी पवार यांच्या लावणी नृत्यांचा लुटला आनंद
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील चार तालुक्यात रियल इस्टेट जगात कमी वेळात आपल्या कंपनीचे नावलौकिक करणारे युनिटी रिलिटीज कंपनीचा चौथा वर्धापन दिन राज रॉयल , कामठी रोड , नागपूर येथे मंगळवार (दि.10) जून रोजी कंपनीचे सभासद व ग्राहकांचा उपस्थित साजरा करण्यात आला .
युनिटी रिलिटीज कंपनीचे संचालक धम्मदीप खोब्रागडे व व्यवस्थापकीय संचालक रवी वर्मा यांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सागर इव्हेंट प्रियंका दंतानी यांनी पार पाडले . यात केरला बँड आकर्षक असून सर्वांचे लक्ष वेधून उपस्थित गर्दीला तालावर नाचायला भाग पाडले होते , तर बऱ्याच लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये बँड त्यांच्या पोशाख यांचे कौतुक करून आढवणी मोबाईल मध्ये सेव्ह केल्या .
तसेच ऋषभ जैन यांनी संगीतमय वातावरण मध्ये अधिक भर पाडली आणि आपल्या आर्केस्ट्रा टीमच्या सहकार्याने एकापेक्षा एक जुने , पुराने , रोमँटिक गाणे गाऊन लोकांना मंत्रमुग्ध केले . कार्यक्रमात उपस्थित युवकांना , युवतींना व महिलांना नाचायला वेड लावले . कंपनीचा कार्यक्रम इतक्यातच न थांबता कार्यक्रमाच्या वर्धापनाला चार चांद लावायला महाराष्ट्रातील लावणी सम्राज्ञी सुप्रसिद्ध कलाकार माधुरी पवार यांनी मराठी लावणी सादर करून उपस्थित कंपनीच्या सभासद सदस्यांना , कुटुंबातील सदस्यांना , ग्राहक वर्गांना नाचायला व मनोरंजना कुठलीच उणीव भासू दिली नाही . लोक बेभाव होऊन तिला बघून लावणीच्या आनंद लुटला प्रेषकांनी टाळ्यांचा कडकडाट , वन्स मोर व शिट्ट्यावाजून सभागृह सेरावेरा करून सोडला .

माधुरी पवार यांनी भावना व्यक्त केली की , नागपूरकरांनी अपेक्षा पेक्षा जास्त प्रेम दिले त्यांचे कौतुक करून कंपनीचे आभार मानले . कंपनीचे संचालक धम्मदीप खोब्रागडे व व्यवस्थापकीय संचालक रवी वर्मा यांनी सर्व संचालक मंडळ सदस्यांचा मोठ्या संख्येत कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सभासद व ग्राहकांशी परिचय करून दिला . खोब्रागडे यांनी सांगितले की संचालकांचा व्यवसायिक दृष्टिकोन तसेच त्यांचे ज्ञान आणि अनुभव यांच्या रिअल इस्टेट कंपनीला फायदा होत असल्याचे सांगितले .
यावेळी कंपनीचे सीए कंपनीचे क्राऊन मॅनेजर किशोर तांडेकर , रॉयल मॅनेजर नंदू कटाणे , रॉयल मॅनेजर शुभम पहाडे व आई – वडील कुटुंबासोबत केक कापून चौथा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला . यावेळी संचालक मंडळानी गेल्या चार वर्षात उत्तम कामगिरी पार पाडणारे कंपनीचे टॉप लीडर , सुपर टॉप लीडर , स्टार लीडर , थर्टी सीएसएल ग्रुपच्या सदस्यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले . तर कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा आभार मानून त्यांच्या कार्याची स्तुती करून त्यांना स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अजाज खान यांनी केले .
यावेळी कार्यक्रमाला शिवराम कनोजे , राजेश शेंडे , मनीष बंदी , आकाश दरवडे , सतीश राय , अर्जुन कनोजे , राजेंद्र नंदगवळी , इरफान खान , निलेश कुशवाह , नरेंद्र उपरकर, शांतनु जोशी, संजय गौतम , तुषार सोनवणे , साचिन निनावे आधी उपस्थित होते .
तर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गौरव जानबंधू , अभय पंतवणे , अमन जांभुळकर , अक्षय शेंडे , रजत सावरकर , ओम कोटांगळे , तन्मय मिलिमले , यादव खडसे , हर्षल शंभरकर , कोविड मारबते , रुशिल मिलिमले , किशोर बोरकर , आकाश घुगल , नजीश अन्सारी ,धोंबाजी नेहारे , भास्कर मडेकर , शैलेंद्र बनसोद , दीक्षा नागदवाने मॅडम , शुभांगी बगतकर मॅडम , आदींनी परिश्रम घेऊन सहकार्य केले .










Comments are closed