Shopping cart

  • Home
  • News
  • महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राचे मोल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राचे मोल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 1, 20251 Mins Read
76

India Morning News

Share News:
Share

मुंबई: महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रांचा सहभाग महत्त्वाचा आहे. येत्या काळात मनोरंजन क्षेत्राची भूमिका निर्णायक ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एन्टरटेन्मेंट समिट (वेव्हज) २०२५ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे झाले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय रेल्वे व माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते.

चित्रपटनगरीत ‘मीडिया ॲन्ड एंटरटेनमेंट सिटी’

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील ५०० एकर परिसरातील चित्रपटनगरीत १२० एकरमध्ये ॲनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी ‘मीडिया ॲन्ड एंटरटेनमेंट सिटी’ उभारली जाणार आहे. हे प्रकल्प पुढील काही महिन्यांत प्रत्यक्षात येतील. वेव्हज परिषदेने भारताचे सर्जनशील क्षेत्रातील नेतृत्व अधोरेखित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक महासत्ता म्हणून स्थान मिळवले असून, आता सर्जनशील क्षेत्रातही आघाडी घेण्यास सज्ज आहे. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थाने असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी नव्या ‘क्रिएटिव्ह वेव्हज’चे स्वागत करण्याचे आवाहन केले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share