India Morning News
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांचा होणार जागर
नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांवर आधारित विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ व १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते ७ या वेळेत नागपूर येथील सोमवारी क्वार्टर सक्करदरा येथील श्री संताजी सभागृहात ही स्पर्धा होईल. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांचा जागर होणार आहे.
या खंजरी भजन स्पर्धेत सहभागी मंडळांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पारंपरिक चालींवर आधारित तसेच प्रबोधनात्मक व राष्ट्रभक्तीवर आधारित विषयांवरची २ भजने १२ मिनिटांच्या अवधीत सादर करायची आहेत. भजन मंडळांत जास्तीत जास्त १२ लोकांचा सहभाग अपेक्षित आहे. भजन करताना वाद्यवृंदामध्ये तबला, हार्मोनिअम, टाळ यासोबत खंजरी असणे अनिवार्य आहे. ही स्पर्धा विदर्भस्तरीय असून विजेत्या भजनी मंडळांना भव्य रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेची महाअंतिम फेरी शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. खंजरी भजन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. १९ जून ते २ जुलै या कालावधीत ऑफलाइन अर्ज भरता येईल. प्रत्यक्ष अर्ज प्राप्त करण्यासाठी ना. श्री. नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात (०७१२-२७२७१२७), गुरुदेव सुपर बाजार विश्वकर्मा नगर (श्री. ज्ञानेश्वर रक्षक – ९८२३९६६२८२) किंवा श्री गुरुदेव सेवा मंडळ सुभाष रोड (श्री. अशोक यावले – ९८२२२६५२६८, श्री. राजेश कुंभलकर – ९६२३७८६१००) येथे संपर्क साधावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने केले आहे.
विजेत्या मंडळाला १ लाख रुपयांचा पुरस्कार
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मंडळाला १ लाख रुपये रोख, उपविजेत्या मंडळाला ७१ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला ५१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांकाला ४१ हजार रुपये, पाचव्या क्रमांकाला ३१ हजार रुपये, सहाव्या क्रमांकाला २१ हजार रुपये तर सातवा क्रमांक पटकावणाऱ्या मंडळाला ११ हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय १० मंडळांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील.










Comments are closed