Shopping cart

  • Home
  • News
  • विधान भवन:मुंबईत 23-24 जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

विधान भवन:मुंबईत 23-24 जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

June 20, 20250 Mins Read
204

India Morning News

Share News:
Share

मुंबई:भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईतील विधान भवनात 23 आणि 24 जून 2025 रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “प्रशासनीय कार्यक्षमता आणि अर्थकारण सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका” या विषयावर या परिषदेत विचारमंथन होणार आहे.

लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती श्री. हरिवंश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या परिषदेला महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री. अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे, लोकसभेच्या अंदाज समितीचे प्रमुख डॉ. संजय जयस्वाल आणि महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख श्री. अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपानंतर 24 जून रोजी श्री. ओम बिर्ला यांची पत्रकार परिषद होईल.

या परिषदेत संसद तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे प्रमुख आणि सदस्य सहभागी होणार असून, महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि राज्यातील खासदारही उपस्थित राहतील. अंदाज समित्यांच्या शिफारसी प्रशासनातील गुणवत्ता सुधारण्यास आणि सरकारी खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास महत्त्वपूर्ण ठरतात.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share