Shopping cart

  • Home
  • News
  • दत्तवाडीच्या श्री म्हसोबाराया यात्रोत्सवात ग्रामस्थांचा उत्साह; खासदार मुरलीधर मोहोळ यांचा सन्मान

दत्तवाडीच्या श्री म्हसोबाराया यात्रोत्सवात ग्रामस्थांचा उत्साह; खासदार मुरलीधर मोहोळ यांचा सन्मान

May 15, 20250 Mins Read
229

India Morning News

Share News:
Share

पुणे: दत्तवाडीचे ग्रामदैवत श्री म्हसोबारायाच्या यात्रोत्सवात ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेत दर्शन आणि आशीर्वाद घेतले. अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी आणि दत्तवाडी ग्रामस्थांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कमिटीच्या वतीने स्वागतपर सन्मान करण्यात आला. मोहोळ यांनी ग्रामस्थांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.

पुण्याचा विकास झपाट्याने होत असला तरी गावच्या यात्रा आणि उरुसाच्या परंपरा ग्रामस्थांच्या उत्साहामुळे आणि सक्रिय सहभागामुळे आजही टिकून आहेत. गावची यात्रा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा आणि आठवणींना उजाळा देणारा विषय आहे. या परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे मत यावेळी मोहोळ यांनी व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी उमेश मस्के, सनी शिंदे, शंकर मोटे, आनंद रिठे, बंडू चोरगे, सुनील भांडवलकर, शंकर थोरवे, संजय चोरगे, सुभाष काळे, गणेश गजमल, विल्सन अलमेडा, संदीप चौधरी, मंगेश जाधव, नितीन गायकवाड, प्रसाद क्षिरसागर, संभाजी जाधव, वसंत कदम, शशि काळे, आनंद फलटणकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share