Shopping cart

  • Home
  • News
  • वर्धा जिल्हा प्रशासनाचा पशुपालक शेतकऱ्यांच्या पाणी व चारा टंचाईवर तोडगा?

वर्धा जिल्हा प्रशासनाचा पशुपालक शेतकऱ्यांच्या पाणी व चारा टंचाईवर तोडगा?

April 29, 20251 Mins Read
201

India Morning News

Share News:
Share

वर्धा: वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आर्वीचे आ. सुमित वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आर्वी व कारंजा (घा.) तालुक्यातील १५ गावांतील पशुपालक शेतकऱ्यांच्या पाणी व चाऱ्याच्या गंभीर समस्येवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. स्थलांतर रोखण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.

सामूहिक वनहक्क दावे त्वरित निकाली काढणे, वनजमिनीवर चराई क्षेत्र निश्चित करणे, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, विहीर पुनर्भरण आणि सीएसआरच्या माध्यमातून नदी-नाल्यांचे खोलीकरण करून जलसाठे वाढवण्याच्या प्रस्तावांवर भर देण्यात आला. वन, कृषी आणि मृद व जलसंधारण विभागांच्या समन्वयाने सात दिवसांत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

शेतकरी आणि पशुपालकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांना काटेकोर सूचना देण्यात आल्या. योजनांच्या अंमलबजावणीसाठी निश्चित वेळेचे पालन करण्यावर प्रशासनाने भर दिला.

या बैठकीस आ. दादारावजी केचे, सुधीरजी दिवे, सरिताताई गाखरे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, जिल्हा आपत्ती निवारण सचिव सुश्री मोरे तसेच वन, कृषी आणि जलसंधारण विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ही पहल जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संकट सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधार देण्याच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share