Shopping cart

  • Home
  • News
  • पाणीकपात रद्द: मुंबई, ठाणे, भिवंडीला दिलासा

पाणीकपात रद्द: मुंबई, ठाणे, भिवंडीला दिलासा

May 28, 20251 Mins Read
251

India Morning News

Share News:
Share

मुंबई:

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पांजरापूर उदंचन केंद्रात टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याचे नियोजित काम प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अंदाजामुळे रद्द करण्यात आले आहे.

त्यामुळे बुधवार, २८ मे २०२५ रोजी सकाळी ९:४५ ते रात्री १०:४५ या १३ तासांसाठी यापूर्वी जाहीर केलेली पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. परिणामी, मुंबईतील शहर विभाग, पूर्व उपनगर तसेच ठाणे आणि भिवंडी-निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील पांजरापूर केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा दैनंदिन वेळापत्रकानुसार सुरळीत राहणार आहे.

नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय नियमित पाणीपुरवठा मिळेल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share