Shopping cart

  • Home
  • News
  • नागपूर महापालिकेच्या १०० जागा लढणार; राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा दावा

नागपूर महापालिकेच्या १०० जागा लढणार; राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा दावा

June 13, 20251 Mins Read
234

India Morning News

Share News:
Share

नागपूर | १३ जून २०२५: नागपूर महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) देखील या निवडणुकीत सक्रीय होत असून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर महापालिकेच्या १०० जागांवर लढण्याचा दावा केला आहे.

देशमुख म्हणाले, “आम्ही १०० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहोत. संघटन बळकट करण्यासाठी आम्ही सध्या जमिनीवर काम करत आहोत.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “महाविकास आघाडीच्या माध्यमातून समन्वयाने आम्ही निवडणुका लढणार आहोत. जर आघाडीत समजुत झाली तर जागा वाटप ठरवलं जाईल.”

निवडणूक होणार की नाही यावरच शंका-

देशमुख यांनी यावेळी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटलं, “ही तर फक्त सुरुवात आहे. सध्या निवडणुका होतील का नाही यावरच शंका आहे. जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे. न्यायालयात जाणारेही हेच लोक आहेत.”

त्यांनी स्पष्ट केलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर महापालिकेच्या १५१ पैकी १०० जागांवर तयारी करत आहे. नंतर आघाडीतील समजुतीनुसार अंतिम जागा निश्चित होतील. एकदा वॉर्ड रचना झाली की निवडणुका लांबवल्या जात नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.”

महाविकास आघाडीचा संदेश

या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपूर महापालिकेतील दावा अधिक ठोस झाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीत (राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) समन्वय साधून उमेदवारी ठरवली जाण्याचे संकेत देखील अनिल देशमुख यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील आगामी महापालिका निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share