Shopping cart

  • Home
  • News
  • विशाल पाटील भाजपमध्ये येणार? चंद्रकांत पाटलांचा पक्षात येण्यासाठी आग्रह

विशाल पाटील भाजपमध्ये येणार? चंद्रकांत पाटलांचा पक्षात येण्यासाठी आग्रह

April 22, 20251 Mins Read
62

India Morning News

Share News:
Share

सांगली : माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आता भाजपने आणखी एक डाव टाकत सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांना पक्षात येण्याचे खुले आवाहन केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यात बोलताना म्हटले की, “विशाल पाटील हे युवक नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्वगुण आणि जनतेच्या प्रश्नांची समज आहे. अशा योग्य व्यक्तींनी भाजपमध्ये यावे ही आमची इच्छा आहे.” त्यांनी स्पष्ट सांगितले की, “ते अपक्ष असल्यामुळे थेट आमच्यासोबत येणे कठीण आहे, पण जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच होईल.”

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही, म्हणजेच मार्च महिन्यात विशाल पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, “राजकारण हे काळानुसार बदलत असते. जर विशाल पाटील आमच्यासोबत आले, तर भाजपच्या ताकदीत वाढ होईल आणि सांगलीच्या प्रगतीलाही वेग येईल.”

संजयकाका पाटलांच्या भवितव्यावर चर्चा-

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते संजयकाका पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणीही केली. संजयकाका यांनी मागील लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती, मात्र नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

या विषयावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, संजयकाका आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अजित पवारांनी पावले उचलायला हवीत. ते आमचे जुने सहकारी आहेत, त्यांना योग्य स्थान मिळावे हीच अपेक्षा आहे. आम्ही या प्रक्रियेसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत.

ह्या घडामोडींमुळे सांगलीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा पुन्हा तापली आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share