Shopping cart

  • Home
  • News
  • जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कन्हान येथे साजरा

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कन्हान येथे साजरा

June 26, 20251 Mins Read
62

India Morning News

Share News:
Share

कन्हान:- कन्हान शहरातील ज्ञान कोचिंग क्लासेस येथे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांनी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्याने १२ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन अमली पदार्थ सेवन करणार नाही अशी शपथ दिली व दर्शनी स्थळी बँनर लावुन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला .

गुरूवार (दि.२६) जुन रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन निमित्याने शहरातील ज्ञान कोचिंग क्लासेस येथे कोचिंग क्लासेस चे प्राध्यापक प्रशांत मंदाळे सर आणि वर्ग १२ वी च्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व त्यापासुन होणारे नुकसान आणि दुष्य परिणाम बाबत कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले . विद्यीर्थ्यांना अमली पदार्थ सेवन करणार नाही याबाबत शपथ देण्यात आली . या प्रसंगी इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेणारे मुले , मुली बहु संख्येने उपस्थित होते . कन्हान पोलीस स्टेशन परिसरात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे बँनर दर्शनी स्थळी लाऊन अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला . कार्यक्रमात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील , नापोशि आतिश मानवटकर प्रामुख्याने उपस्थित होते .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share