India Morning News
पुणे:-
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टी, कसबा गणपती मंडल, कसबा मतदारसंघाच्या वतीने श्री चिमण्या गणपती मंडळ, टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि दिग्विजय मित्र मंडळ यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे आणि त्याचा समतोल राखणे ही केवळ गरज नसून आपली नैतिक जबाबदारी आहे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. आज आपण जबाबदारीने वागलो, तर उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि हिरवेगार जीवन देऊ शकतो, असे आवाहनही करण्यात आले.
पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे, पाणी वाचवणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे या माध्यमातून सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले.
यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, कसबा गणपती मंडलाचे अध्यक्ष अमित कंक यांच्यासह कसबा मतदारसंघातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, गणेश मंडळांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.









Comments are closed