Shopping cart

  • Home
  • Sports
  • वर्ल्ड रेकॉर्ड! इंग्लंडचा दणदणीत विजय, टीम इंडियाचा विक्रम इतिहासजमा

वर्ल्ड रेकॉर्ड! इंग्लंडचा दणदणीत विजय, टीम इंडियाचा विक्रम इतिहासजमा

September 8, 20251 Mins Read
87

India Morning News

Share News:
Share

साउथहॅम्प्टन (दक्षिण आफ्रिका) : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने विक्रमी कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा ३४२ धावांनी दारुण पराभव केला. या अभूतपूर्व विजयासह इंग्लंडने भारताच्या नावावर असलेला सर्वाधिक धावांच्या फरकाने विजयाचा विश्व विक्रम मोडीत काढला.

इंग्लंडचा डोंगराएवढा डाव-

पहिल्या दोन सामन्यांत अपयश पत्करलेल्या इंग्लंडने या सामन्यात भेदक पुनरागमन केलं. जेकब बेथेल (११०) आणि जो रूट (१००) यांच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने ५० षटकांत केवळ पाच गडी गमावून ४१४ धावा रचल्या.

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी धुळीस मिळाली-

प्रचंड धावांचा पाठलाग करताना आफ्रिकन फलंदाज इंग्लंडच्या माऱ्यासमोर टिकूच शकले नाहीत. अवघ्या २१ व्या षटकात ७२ धावांवर संपूर्ण संघ गुडघे टेकला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ४ बळी घेतले, आदिल रशीदने ३ तर ब्रायडन कार्सने २ गडी बाद केले.

टीम इंडियाचा विक्रम मागे टाकला-

आतापर्यंत वनडेत सर्वाधिक फरकाने विजयाचा विक्रम भारताच्या नावावर होता. २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेला ३१७ धावांनी हरवले होते. मात्र इंग्लंडने तब्बल ३४२ धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून हा विक्रम मागे टाकत नवा इतिहास रचला आहे.

वनडे इतिहासातील नवा अध्याय-

५ जानेवारी १९७१ रोजी पहिला वनडे खेळला गेला. त्यानंतरच्या ५४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने ३४० हून अधिक धावांनी विजय मिळवला आहे. या दणक्यातून इंग्लंडने केवळ मालिका वाचवली नाही, तर क्रिकेटच्या इतिहासात नवा टप्पा गाठला आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share