Shopping cart

  • Home
  • News
  • अंधेरी पश्चिम अंगणवाडीत खिचडीत किडे; अन्नवितरण थांबवले, कारवाईची मागणी

अंधेरी पश्चिम अंगणवाडीत खिचडीत किडे; अन्नवितरण थांबवले, कारवाईची मागणी

September 5, 20250 Mins Read
155

India Morning News

Share News:
Share

मुंबई :  अंधेरी पश्चिम येथील अंगणवाडी केंद्रात मुलांना देण्यात येणाऱ्या खिचडीत किडे आढळल्याने संतापाची लाट पसरली आहे. ३१ ऑगस्ट रोजी कर्तारसिंह रुग्णालयाजवळील दारुल सलाम अंगणवाडी क्रमांक १३६ येथे ही घटना घडली. सुदैवाने, अन्न मुलांपर्यंत पोहोचण्याआधीच कर्मचाऱ्यांनी हा प्रकार लक्षात घेऊन खिचडीचे वाटप थांबवले.

ही खिचडी ग्रिष्मा महिला मंडळ या स्वयंसहायता गटामार्फत पुरवली जात होती. घटनेनंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनेने यावर तीव्र आक्षेप घेत, निष्काळजीपणा गंभीर असल्याचे सांगितले आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, माजी महिला व बालविकास मंत्री तसेच खासदार वर्षा गायकवाड यांनीही नाराजी व्यक्त करत म्हटले की, “अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट अन्न देण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. हे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. तात्काळ जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे.”

मात्र, ग्रिष्मा महिला मंडळाच्या सचिव दीप्ती सरवडेकर यांनी आरोप फेटाळले. त्या म्हणाल्या की, त्यांच्या संस्थेकडून नेहमीच पौष्टिक अन्न पुरवले जाते आणि जर कर्मचाऱ्यांनीच अन्न बनवले असेल तर जबाबदारी त्यांच्यावर आहे.

या प्रकरणामुळे अंगणवाड्यांतील अन्नपुरवठ्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share