India Morning News
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री स्व. डॉ. श्रीकांत जिचकर यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये पुनरागमन केले आहे. गुरुवारी मुंबई येथील तिलक भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला.
याज्ञवल्क्य जिचकर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान काटोल मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र आता, पुन्हा काँग्रेसमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले असून, राजकीय वर्तुळात या घटनेला विशेष महत्त्व दिले जात आहे.
याज्ञवल्क्य सध्या महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव आहेत आणि त्यांचे पुनरागमन काँग्रेसच्या युवा नेतृत्वासाठीही एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
या कार्यक्रमानंतर जिचकर यांनी सांगितले की, पक्षाच्या धोरणांवर माझा पूर्ण विश्वास आहे. आता जोमाने पक्षासाठी आणि जनतेसाठी काम करणार आहे.










Comments are closed