Shopping cart

  • Home
  • Politics
  • येरखेडा निवडणूक 2025: राजकिरण बर्वेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

येरखेडा निवडणूक 2025: राजकिरण बर्वेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 20251 Mins Read
Rajkiran Barve campaigning for Yerkheda Nagar Panchayat Election 2025
534

India Morning News

Share News:
Share

येरखेडा – येरखेडा नगरपंचायत निवडणूक 2025 जवळ येत असताना भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिरण शिवराम बर्वे यांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. गावातील विविध प्रभागांमध्ये होत असलेल्या त्यांच्या जनसंपर्क दौऱ्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

राजकिरण बर्वे यांनी गेल्या काही दिवसांत घर-दारी जाऊन नागरिकांशी संवाद साधत विकासाची हमी दिली. ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करत येरखेडा परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

त्यांच्या प्रचाराला अनेक सामाजिक संघटना, व्यावसायिक मंडळे, युवक गट आणि महिला बचतगटांनी खुलेपणाने समर्थन दिले आहे. बर्वे हे कार्यक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

येरखेडा नगरपंचायत निवडणूक 2025 साठी राजकिरण बर्वे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रचारादरम्यान दिसणारी मोठी गर्दी, तरुणांचा उत्साह आणि महिलांचा सक्रिय सहभाग पाहता गावात बर्वे यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, अलीकडच्या काळात थांबलेली विकासकामे पुन्हा गतीमान करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे, आणि ती क्षमता बर्वे यांच्या रूपाने आहे.

नागरिकांशी संवादात बर्वे यांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि सांस्कृतिक केंद्रांच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच युवकांसाठी रोजगारकेंद्रित उपक्रम, महिलांसाठी विशेष योजना आणि क्रीडांगण विकासाचेही त्यांनी जाहीर केले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रतिसादामुळे बर्वेंचा प्रचार अधिक वेग घेत असून मतदानापूर्वी राजकीय वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share