Shopping cart

  • Home
  • News
  • नागपूरच्या विहीरगावात तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात प्रहार करून ठार

नागपूरच्या विहीरगावात तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात प्रहार करून ठार

June 7, 20251 Mins Read
44

India Morning News

Share News:
Share

नागपूर : हिंगणा रोडवरील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहीरगाव परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख यवतमाळ जिल्ह्यातील पिपळगाव येथील रहिवासी अनिल मधुकर पवार (वय ३६) अशी झाली असून, तो नागपूरमधील त्रिमूर्ती बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या अंदाजे ५ ते ६ दिवसांपूर्वी झाल्याचा संशय आहे. अनिलच्या डोक्यावर जड वस्तूने जोरदार प्रहार करून त्याचा खून करण्यात आला आहे. शवाची अवस्था पाहता, मृतदेह बंद खोलीत अनेक दिवस पडून राहिल्याचे स्पष्ट होते.

शेजाऱ्यांना घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे संशय आला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, खोलीत रक्ताने माखलेला अनिलचा मृतदेह आढळून आला. खोलीत एक गॅस सिगडी आणि हेल्मेटवर रक्ताचे डाग आढळले असून, त्याच साधनांचा वापर करून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अनिल १५ मे रोजी नोकरीच्या शोधात नागपूरला आला होता. तो विहीरगाव परिसरात आपल्या मित्रासोबत राहात होता. त्याचा मित्र राज पवार ‘दी होटल शिप’मध्ये वेटर म्हणून काम करत असून, सद्यस्थितीत तो पसार आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय राज पवारवर आहे.

सध्या हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या थरारक खुनामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांनी लवकरात लवकर गुन्ह्याचा उलगडा करण्याची मागणी केली आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share