India Morning News
नागपूर: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता ऑनलाइन कन्फर्म तिकीटाची प्रवास तारीख मोफत बदलण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठी सोय मिळणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआरसीटीसी आणि संबंधित विभागांना ही सुविधा तत्काळ लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ही सुविधा फक्त ऑफलाइन तिकिटांसाठी उपलब्ध होती, परंतु आता ती ऑनलाइन तिकिट धारकांनाही लागू होणार आहे.
सध्या प्रवाशांना प्रवासाची तारीख बदलायची असल्यास तिकीट रद्द करून नवीन तिकीट बुक करावे लागते, ज्यासाठी रद्द शुल्क आकारले जाते. नव्या सुविधेमुळे प्रवासी तिकीट रद्द न करता थेट तारीख बदलू शकतील, ज्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल.
तिकीट रद्द शुल्क (सध्याचे दर):
-
एसी फर्स्ट क्लास / एक्झिक्युटिव्ह क्लास – ₹240 + GST
-
एसी 2 टियर / फर्स्ट क्लास – ₹200 + GST
-
एसी 3 टायर / एसी चेअर कार / एसी 3 इकॉनॉमी – ₹180 + GST
-
स्लीपर क्लास – ₹120
-
द्वितीय श्रेणी – ₹60
सध्या ऑफलाइन तिकिटांसाठी प्रवासी ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी तिकीट रद्द करून नवीन तारीख ठरवू शकतात. ऑनलाइन सुविधेच्या अंमलबजावणीनंतर हा पर्याय आणखी सोपा आणि सुलभ होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, ही सुविधा लवकरच IRCTC वेबसाइट आणि अॅपवर उपलब्ध होईल. यामुळे प्रवास नियोजन करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
Comments are closed