Shopping cart

  • Home
  • News
  • डिझेलच्या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

डिझेलच्या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

September 26, 20250 Mins Read
Action against illegal transporters of diesel
69

India Morning News

Share News:
Share

बोलेरो पिकअपमधून ४७० लीटर अवैध डिझेल जप्त

तुमसर : तालुक्यातील गोबरवाही पोलिसांनी अवैध डिझेल वाहतुकीवर कारवाई करत बोलेरो पिकअपसह तब्बल ९ लाख ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ६.४० वाजता देवनारा ते आसलपाणी जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती व्यंकटराव गिते यांच्या नेतृत्वाखाली पथक गस्त घालत असताना संशयित बोलेरो पिकअप (क्र. एमएच ३६/ एजे १८८४) अडविण्यात आले. वाहनतपासणी केली असता मागील डब्यात १० प्लास्टिक कॅन (८ निळे व २ काळे) आढळले. ज्यात प्रत्येकी ४७ लीटर प्रमाणे एकूण ४७० लीटर डिझेल होते. त्याची बाजारभावानुसार किंमत ४२ हजार ३०० रुपये आहे. वाहनचालक व मालक प्रभुदास लक्ष्मण अवथरे (४६, रा. हेटी/गोरेघाट, मध्यप्रदेश) असून कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. बोलेरो पिकअपची किंमत ९ लाख रुपये असून एकूण जप्त मालमत्ता ९ लाख ४२ हजार ३०० रुपये इतकी आहे. या प्रकरणात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३, ७ व पेट्रोलियम अँक्ट १९३२ च्या कलम ४, २३ अंतर्गत गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share