India Morning News
नवी दिल्ली : इंग्लंडचा अनुभवी ऑलराऊंडर क्रिस वोक्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
२०२५ हे वर्ष निवृत्तीचं ठरतंय असं म्हणायला हरकत नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर आता इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिस वोक्स यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यांनी सोमवारी, २९ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत निवृत्ती जाहीर केली.
👉 क्रिस वोक्सची कारकीर्द:
-
वय : ३६ वर्षे
-
आंतरराष्ट्रीय कारकीर्द : सुमारे १४ वर्षे (२०११–२०२५)
-
पदार्पण : २०११, T20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध
-
ODI सामने : १२२, विकेट्स – १७३
-
टेस्ट क्रिकेट : १२९ विकेट्स, सरासरी – २९.६
-
२०१९ च्या ५० ओव्हर वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाचा महत्त्वाचा भाग
👉 वोक्सचे वक्तव्य:
“वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा हा योग्य क्षण आहे. इंग्लंडसाठी खेळणे हे माझं बालपणीचं स्वप्न होतं. ३ सिंह असलेली जर्सी परिधान करून १५ वर्षे सहकाऱ्यांसोबत खेळणे आणि त्यातले काही मित्र होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
क्रिस वोक्स इंग्लंडसाठी एक विश्वासार्ह ऑलराऊंडर ठरले. त्यांच्या गोलंदाजीने अनेकदा संघाला विजय मिळवून दिला, तर फलंदाजीमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Comments are closed