Shopping cart

  • Home
  • News
  • राष्ट्रीय पोषण सप्ताहाला शासकीय उपजिल्हा रुग्णालय सुरुवात

राष्ट्रीय पोषण सप्ताहाला शासकीय उपजिल्हा रुग्णालय सुरुवात

September 16, 20251 Mins Read
राष्ट्रीय पोषण सप्ताहाला
130

India Morning News

Share News:
Share

राष्ट्रीय पोषण सप्ताहाला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सुरुवात; जनजागृती उपक्रमांतून आरोग्य, संतुलित आहार व पोषणाचे महत्त्व अधोरेखित.

भंडारा : सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे डॉ. नितीन मिसुरकर, वैद्यकीय अधीक्षक यांच्या हस्ते फीत कापून राष्ट्रीय पोषण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. पोषण सप्ताह दिनांक १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार असून कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. मिसुरकर म्हणाले की, पौष्टिक आहार व नियमित व्यायामाद्वारे निरोगी जीवन जगता येतो. काय? कसे? व केव्हा? खावे याचं ज्ञान मिळविल्यास अनेक आजारांना दूर ठेवता येतो.

त्यामुळे या पोषण सप्ताहाला भेट देऊन जनतेने पोषण आहाराविषयक माहिती जाणून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला डॉ. सचिन बाळबुदे, वैद्यकीय अधिकारी, रंजना नंदनवार मेट्रन, आरोग्य सहाय्यक संजय आखरे, आरोग्य कर्मचारी अंकित गणवीर, अमित उके प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विनिता चकोले, आहार तज्ञ यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर आरोग्य कर्मचारी, रुग्ण-नातेवाईक उपस्थित होते.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share