Shopping cart

  • Home
  • Sports
  • भारताने जिंकला एशिया कप 2025; पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारताने जिंकला एशिया कप 2025; पाकिस्तानवर दणदणीत विजय

September 29, 20251 Mins Read
India wins Asia Cup 2025
121

India Morning News

Share News:
Share

*रोमहर्षक लढतीत भारताने मारली बाजी*

दुबई:दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर रंगलेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेटांनी शानदार विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले. हा भारत-पाकिस्तानमधील तिसरा सामना असून, भारताने या स्पर्धेत पाकविरुद्ध अपराजित राहिल्याची मोहक कामगिरी केली.

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दणकट प्रत्युत्तर देत इतिहास रचला. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान भिडले.

दुबई मध्ये होत असलेल्या एशिया कपच्या शेवटच्या सामन्यांमध्ये भारत पाकिस्तान भारताने विजय मिळवला आहे. आशिया कप मधील भारत पाकिस्तान हा तिसरा सामना होता. पाकिस्तानी प्रथम फलंदाजी करत १४६ धावा करु शकल्या.तर भारताने ५ विकेटच्या मोबदल्यात १५० केल्या आणि विजय खेचून आणला.

प्रत्युत्तर दाखल भारताचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. मधल्या फळीने चांगली फलंदाजी करत तिलक वर्मा ६९ धावा आणि शिवम् दुबे देखील यांनी चांगली फलंदाजी करत भारताला विजयाकडे घेऊन गेले.

भारताची ही विजय यात्रा एशिया कप इतिहासात अविस्मरणीय ठरली, ज्यात त्यांनी टूर्नामेंटमध्ये एकही सामना गमावला नाही.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share