India Morning News
नवी दिल्ली: बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली असून मोठे बदल करण्यात आले आहेत. दीर्घ विश्रांतीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा संघात परतले आहेत, तर कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. या काळात तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामने खेळले जाणार आहेत. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी गिलवर विश्वास दाखवत त्याला वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व दिले आहे.
रोहित शर्मा केवळ फलंदाज म्हणून संघात दिसणार असून, डिसेंबर २०२१ नंतर तो प्रथमच खेळाडू म्हणून संघात आला आहे. विराट कोहली चाही वनडे संघात पुनरागमन झाले आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर हार्दिक पांड्या फिटनेस समस्येमुळे अनुपस्थित राहणार आहे.
या संघात तरुणाई आणि अनुभवी खेळाडूंचा समन्वय दिसत असून ऑस्ट्रेलिया दौरा वर्ल्ड कपपूर्वीची भारतासाठी महत्त्वाची चाचणी ठरणार आहे.
Comments are closed