India Morning News
पुणे: दैनंदिन जीवनात सकारात्मकता टिकवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी कधी कधी निराशेचा कड मनाला ग्रासतो. अशा वेळी अनवधानाने व्यसनांचा आधार घेतला जातो. यावर मात करण्यासाठी सुश्री फाउंडेशन आणि मैत्र गटातर्फे रविवारी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पेस पुणे येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. वंदना जोशी यांनी व्यसनाधीनता रोखण्यासाठी मार्गदर्शन करताना प्रभावी चित्रफितींचे सादरीकरण केले.
डॉ. वंदना जोशी म्हणाल्या, “व्यसनाधीनता ही वय आणि आजूबाजूच्या परिसरावर अवलंबून असते. व्यसनाधीनता रोखण्यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी नमूद केले. यावेळी जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधत गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मैत्र गटाचे सदस्य योगेश सराफ, सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या वेळी सुश्री फाउंडेशनचे पदाधिकारी वैभव रांजणगावकर, जान्हवी ओक यांच्यासह प्रमोद लिमये, विजय जोशी, श्रीराम सबनीस आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम निराशा दूर करून प्रत्येकाचे आयुष्य आरोग्य आणि आनंदाच्या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.
व्यसनमुक्त आणि सकारात्मक जीवनासाठी हा उपक्रम एक पाऊल पुढे टाकणारा ठरला. समाजातील प्रत्येक व्यक्तीने निराशेला दूर सारून निरोगी आयुष्य जगावे, अशी प्रेरणा या उपक्रमामागे होती.
Comments are closed