Shopping cart

  • Home
  • News
  • तुमसर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर

तुमसर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर

October 4, 20250 Mins Read
तुमसर आरोग्य अधिकारी कार्यालय स्थलांतर
9

India Morning News

Share News:
Share

तुमसर (भंडारा): तुमसर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे पंचायत समिती येथून सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले आहे. या बदलामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यालयाचे स्थलांतर गुप्ततेने करण्यात आले असून, जुन्या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेहबूब कुरेशी यांनी सांगितले की, हे स्थलांतर शासनाच्या आरोग्य विभागाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे. तसेच सूचना फलक लवकरच दर्शनी भागात लावण्यात येईल.

तुमसर तालुक्यात सध्या देव्हाडी, चुल्हाड, गोबरवाही, नाकाडोंगरी आणि लेंडेझरी अशी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. गावपातळीवर आशा वर्करमार्फत आरोग्य सेवा पुरवली जाते.

कुरेशी यांनी पुढे सांगितले की, १५ व्या वित्त आयोगाच्या योजनेनुसार बीपीएचयू (ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट) इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सेवा मिळणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share