Shopping cart

  • Home
  • News
  • ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेत बदल; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना मोठी संधी

‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेत बदल; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना मोठी संधी

September 20, 20251 Mins Read
146

India Morning News

Share News:
Share

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना आणखी सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांकडून योजनेच्या निकषात बदल करण्याच्या मागणीचा विचार करून ऊर्जा विभागाने मार्गदर्शक सूचना काढाव्यात, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांच्यासह संवाद वाढवून कामे गतीने पार पाडेल. महापारेषण कंपनीने चालू आर्थिक वर्षात अंदाजे 1800 कोटी रुपयांचा नफा कमावला असून, आगामी वर्षातही या कामगिरीमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना राबवली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार 3, 5, 7.5 अश्वशक्ती (HP) क्षमतेचे सौर पंप मिळणार आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्यांना पंपाची किंमत फक्त 10% भरावी लागेल, तर अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकऱ्यांसाठी फक्त 5% रक्कम भरून पंप उपलब्ध होणार आहे. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाईल.

अर्ज कसा करावा?
मागेल त्याला सौर पंप योजना महावितरण कंपनीच्या मार्फत राबवली जाते. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी कोणत्याही वेळी अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन www.mahadiscom.in किंवा जवळच्या महावितरण कार्यालयातून ऑफलाईन करता येईल.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share