India Morning News
पुणे: गौतमी पाटीलच्या कार अपघातामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला जोरात धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यासह रिक्षामध्ये असलेले प्रवासीही जखमी झाले आहेत.
पोलिसांनी चालकावर अमली पदार्थांचे सेवन केले आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी त्याचा रक्ताचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला हा प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. अपघातानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटीलवर अटक करण्यासाठी आंदोलन केले. रिक्षाचालकाच्या मुलीनेही वडिलांच्या उपचाराचा खर्च गौतमी पाटीलनेच भरण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली असून, सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि अपघातानंतर क्रेन कोणाने बोलावली, हे तपासले जाणार आहे.
अपघातानंतर गौतमी पाटील किंवा तिच्या टीमकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, तर रिक्षाचालकाकडूनही पोलिसांवर प्रकरणात योग्य सहकार्य न केल्याचे आरोप आहेत. कार गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुढील काळात गौतमी पाटीलवर कोणती कारवाई होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed