India Morning News
तुमसर (३ सप्टेंबर) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नगरपरिषद, तुमसर येथे आयोजित भव्य जनसुनावणी आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गाने पार पडले. या आंदोलनात महिला, वृद्ध, युवा अशा सर्वच वर्गातील नागरिकांच्या समस्या नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यामध्ये शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, गटार व सांडपाणी व्यवस्थापन, कचरा संकलन, वीजपुरवठा तसेच आरोग्यसंबंधी अनेक प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली. यावेळी नगरपालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व समस्यांची नोंद घेऊन त्यांच्या निराकरणासाठी आश्वासक भूमिका मांडली.
त्यामुळे नागरिकांनी जनसुनावणी आंदोलन यशस्वी ठरल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गौरव नवरखेले, जिल्हा उपाध्यक्ष अनिल जीभकाटे, जिल्हा सचिव मेहताबसिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष अभियंता सेल जवाहर कुंभलकर, जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक विजय रहांगडाले, जिल्हा सोशल मिडिया प्रमुख बालचंद बोंद्रे, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष अरुण मोखारे, जिल्हाध्यक्ष ग्राहक संरक्षण सेल सचिन बडवाईक, जिल्हाध्यक्ष वाहतूक सेल गीतेश ठोंबरे, शहर अध्यक्ष हेमराज नागफासे.
भंडारा शहर अध्यक्ष मधुकर चौधरी, तालुका अध्यक्ष छोटु तुरकर,जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय रिना माटे, शहर सरचिटणीस अजय बडवाईक, प्रवीण कहालकर, किशोर माटे, ओबीसी शहर अध्यक्ष सागर बिसने, असंघटित कामगार सेल शहर अध्यक्ष मोहित मेश्राम, ज्येष्ठ नागरिक शहर अध्यक्ष शेखर बिसेन, शहर सामाजिक न्याय विभाग मुकेश वाघमारे, विठ्ठल बावनकर, परमानंद कटरे, रमेश हलमारे, मगनलाल पटले, शालुताई वहाने, भाऊलाल बांडेबुचे, वसंत कनोजे, शैलेंद्र बावनकर, रवी समरीत, डॉ. घनश्याम मडावी, प्रशांत हटवार, पंकज राठोड, अरविंद भुसारी, सुशील कुंभारे, जमशेर पठाण, शिवराज वैद्य, नितेश शेंडे, सुनील मेहर, सुषमा वहाने, राजू झलके, दिलीप कामथे, नरेश खराबे, योगेश रंगवणी उपस्थित होते.
Comments are closed