India Morning News
श्री लक्ष्मी माता मंदिर: पुण्यातील आस्थेचे आणि मनोकामनापूर्तीचे पवित्र स्थान
पुणे: शिवदर्शन परिसरात वसलेले श्री लक्ष्मी माता मंदिर हे आज भक्तांच्या आस्थेचे आणि मनोकामनापूर्तीचे दैवी स्थान म्हणून ओळखले जाते. साधारण ३१ वर्षांपूर्वी येथे एका छोट्या पत्र्याच्या देवळात भक्त येत असत. पण समाजसेवक श्री. आबा बागुल यांना स्वप्नात देवीचा दैवी संदेश मिळाल्यानंतर या ठिकाणी भव्य मंदिर उभारणीचा संकल्प करण्यात आला.
मंदिर उभारणीची दैवी प्रेरणा
आबा बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसराची स्वच्छता करून मंदिर उभारणीस सुरुवात केली. विशेष म्हणजे, दक्षिण भारतातील कारागिरांनाही देवीने दृष्टांत देत मंदिर घडवण्याची आज्ञा दिली होती. यामुळे दाक्षिणात्य शैलीतील सुंदर मंदिर उभे राहिले.
अद्वितीय शिल्पकला आणि मूर्ती
प्रसिद्ध शिल्पकार दादा जगताप यांनी घडवलेली संगमरवरी श्री लक्ष्मी मातेची मूर्ती हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. मंदिरात तब्बल १०५ शिल्पांची कलात्मक सजावट आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी पाच हजार कमळांची व्यवस्था करण्यात आली आणि भव्य मिरवणुकीसह मूर्तीची स्थापना करण्यात आली.
भक्तांची श्रद्धास्थळ
आज हे मंदिर संकटनिवारण, मनोकामनापूर्ती आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ख्यातनाम आहे. राजकारण, संगीत, अभिनय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह सर्वसामान्य भक्त येथे दर्शनासाठी येतात. दररोज वाढणारी भक्तांची रीघ हीच देवीच्या कृपेची साक्ष आहे.
Comments are closed