Shopping cart

  • Home
  • News
  • एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 13 ऑक्टोबरपासून | दिवाळीत लालपरी थांबणार?

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 13 ऑक्टोबरपासून | दिवाळीत लालपरी थांबणार?

September 26, 20250 Mins Read
महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार; दिवाळीत लालपरी थांबण्याची शक्यता
64

India Morning News

Share News:
Share

दिवाळीत लालपरी थांबणार? 13 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई: महाराष्ट्रातील एसटी कामगार संघटनांनी 13 ऑक्टोबरपासून मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. थकबाकी, वेतनवाढ, दिवाळी भेट आणि इतर अनेक प्रलंबित मागण्या न सोडवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार आहे.

सरकारसमोर रखडलेल्या मागण्या पुन्हा ऐरणीवर

24 सप्टेंबर रोजी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांना दिलेल्या नोटिशीत या आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन होणार असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.

या आंदोलनाला महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, एसटी कामगार सेना, कास्ट्राइब संघटना, शिव परिवहन वाहतूक सेना, मोटार कामगार फेडरेशन, एसटी कामगार काँग्रेस आणि इतर संघटनांचा पाठिंबा आहे.

खासगीकरणाविरोधात संताप

सरकारने नुकतीच 36 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती जाहीर केली आहे. याआधी 25 हजार कायम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे विधान करण्यात आले होते. नव्या निर्णयामुळे एसटी खासगीकरणाची भीती कामगारांमध्ये वाढली आहे. त्यामुळे कामगारांची मागणी आहे की, कंत्राटीऐवजी कायम कर्मचाऱ्यांची भरती करावी आणि पीपीपी मॉडेलऐवजी महामंडळाने स्वतः विकासकामे करावीत.

कामगारांच्या प्रमुख मागण्या

  • 2020–2024 या काळातील थकबाकी रक्कम द्यावी.

  • 2018 पासूनचा महागाई भत्ता लागू करावा.

  • 2016–2021 मधील वेतनवाढीचे आणि घरभाडे भत्याचे पैसे अदा करावेत.

  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता लागू करावा.

  • या वर्षी 15 हजार रुपयांची दिवाळी भेट द्यावी.

  • करारनिहाय 12,500 रुपयांची उचल मिळावी.

  • निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकरकमी द्यावीत.

  • निवृत्तांना व त्यांच्या कुटुंबीयांना एक वर्षाचा मोफत पास द्यावा.

ईव्ही करारावरील प्रश्नचिन्ह

सध्या महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या 9 व 15 मीटरच्या ईव्ही बस तोट्यात चालवल्या जात आहेत. शासनाकडून अनुदानाशिवाय या बसेस तोट्यात जात असल्याने कामगारांनी आक्षेप घेतला आहे. त्याऐवजी महामंडळाने स्वतःच्या मालकीच्या ईव्ही बस घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share