India Morning News
नागपूर: नागपूर महानगरपालिका (NMC) आणि ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांच्या संयुक्त विद्यमाने नंदनवन एक्झिस्टिंग ESR वर 8 ऑक्टोबर 2025 (बुधवार) रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 या वेळेत 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत नंदनवन ESR परिसरात 800 × 600 मि.मी. व्यासाच्या आउटलेट पाइपलाइनचे इंटरकनेक्शन काम करण्यात येईल.
प्रभावित क्षेत्रे:
नंदनवन एक्झिस्टिंग कमांड एरिया – नंदनवन झोपडपट्टी, जगनाडे चौक ते KDK कॉलेज, व्यंकटेश नगर, कवेलू क्वार्टर, LIG व MIG क्वार्टर्स, नंदनवन लेआउट, नंदनवन कॉलनी, कीर्ती नगर, प्रशांत नगर.
सदर भागातील नागरिकांनी कृपया पाण्याचा पुरेसा साठा आगोदर करून ठेवावा व शटडाऊन काळात पाणी संयमाने वापरावे. नियोजित काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा त्वरित पूर्ववत करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी NMC-OCW हेल्पलाइन 1800 266 9899 वर संपर्क साधा किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करा.
Comments are closed