India Morning News
सोलापूर, अहिल्यादेवीनगर आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सोलापूर:मराठवाडा, सोलापूर आणि अहिल्यादेवीनगर परिसरात नुकत्याच आलेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
पूरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास साहित्य नष्ट झाले असून, वाचनालये बंद आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने अभ्यासाचे वातावरण पूर्णपणे बिघडले आहे. या परिस्थितीत परीक्षा देणे अनेक विद्यार्थ्यांसाठी अशक्यप्राय ठरत आहे.
विद्यार्थ्यांनी पत्रात म्हटले आहे, “पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन २८ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी किंवा योग्य व्यवस्था करावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून न्याय्य निर्णय घ्यावा.”
विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली असून, त्यांच्या मागणीवर शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed